पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे कॅलेंडरचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न..

कोल्हापूर दि. १७

भाविकांकडून बहुप्रतीक्षित असणारे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे कॅलेंडरचे प्रकाशन कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्त करणेत आले. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही देवस्थान व्यवस्थापन समिती प म कोल्हापूर यांचे वतीने सन 2025 साठी श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवीचे तसेच इतर स्थानिक देवस्थान कडील फोटो व इतर सण उत्सव दर्शविणारे दिनदर्शिकेचे प्रकाशन मा अमोल येडगे जिल्हाधिकारी तथा प्रशासक देवस्थान समिती प म कोल्हापूर यांचे हस्ते करणेत आले त्यावेळी मा शिवराज नाईकवाडे सचिव देवस्थान समिती प म महादेव दिडे व्यवस्थापक अंबाबाई मंदिर सौ अस्मिता मोठे लेखाधिकारी व श्रीमती शितल इंगवले आदी उपस्थित होते

सदर कॅलेंडर मंदिर परिसरात नाममात्र देणगीमूल्य रु. 60/- ला उपलब्ध असणार आहेत. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान समिती च्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *