कोल्हापूर, दि. १५, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 202 च्या गृहमतदानाला दिनांक १४ नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली. गृहमतदानाच्या दुसऱ्या दिवशी दिनांक १५ नोव्हेंबर रोजी १ हजार ८५४ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तर एकूण ४ हजार ४१३ येवढ्या मतदारांनी मतदान केले. भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांपुढील व दिव्यांग मतदार जे मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकणार नाहीत. त्यांच्यासाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघातील ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे, दिव्यांग मतदारांची नोंद करून अर्ज भरून घेतले आहेत. यापैकी आज मतदान केंद्रात जावून मतदान करणे शक्य नसलेल्या मतदारांची संख्या 4 हजार ६३७ एवढी आहे. यात ८५ वर्षावरील ३ हजार ८७० मतदार असून ७३१ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.
आज झालेल्या मतदानात ३२९ दिव्यांग, १ हजार ५२५ जेष्ठांचा समावेश होता. विधानसभा संघनिहाय गृह मतदारांची संख्या व कंसात एकूण मतदान पुढीलप्रमाणे आहे.
२७१- चंदगड ८५ वर्षांपुढील १८६, दिव्यांग ५१ असे एकूण २३७ मतदारांचा समावेश आहे(५४१ पैकी ५१२),
२७२- राधानगरी ८५ वर्षांपुढील २४५, दिव्यांग ३९, अत्यावश्यक सेवेतील ९ असे एकूण २९३ मतदारांचा समावेश आहे. (६६४ पैकी ६२६),
२७३- कागल ८५ वर्षांपुढील २८५, दिव्यांग ७४ असे एकूण ३५९ मतदारांचा समावेश आहे. (७३८ पैकी ७१६),
२७४- कोल्हापूर दक्षिण ८५ वर्षांपुढील ३२, दिव्यांग ५ असे एकूण ३७ मतदारांचा समावेश आहे. (५२७ पैकी ५०९),
२७५- करवीर ८५ वर्षांपुढील १६६, दिव्यांग ३९ असे एकूण २०५ मतदारांचा समावेश आहे. (४२८ पैकी ४१०)
२७६- कोल्हापूर उत्तर ८५ वर्षांपुढील १४८, दिव्यांग २२ असे एकूण १७० मतदारांचा समावेश आहे(४१० पैकी ४४३).
२७७ – शाहुवाडी ८५ वर्षांपुढील १५५, दिव्यांग ६२ असे एकूण २१७ मतदारांचा समावेश आहे. (४४७ पैकी ४२१)
२७८- हातकणगंले ८५ वर्षांपुढील ७२, दिव्यांग ३ असे एकूण ७५ मतदारांचा समावेश आहे. (१७६ पैकी १६९)
२७९- इचलकरंजी ८५ वर्षांपुढील ९१, दिव्यांग १४ असे एकूण १०५ मतदारांचा समावेश आहे. (२२९ पैकी २२४)
२८०- शिरोळ ८५ वर्षांपुढील 1१३६, दिव्यांग २० असे एकूण १६५ मतदारांचा समावेश आहे. (४१७ पैकी ३८३)
जिल्ह्यातील १० मतदारसंघातील दिव्यांग ३७३ मतदारांपैकी आज 329 मतदारांनी तर एकूण ७१२मतदारांनी मतदान केले. तसेच अत्यावश्यक सेवेतील १८ पैकी ९ मतदारांनी तर १७ मतदारांनी मतदान केले अशा प्रकारे ४६३७ पैकी ४४१३ मतदारांनी मतदान केले.