केंद्रीय मंत्री नामदार ज्योतिरादित्य सिंधिया यांचे, खासदार धनंजय महाडिक यांनी केले स्वागत

कोल्हापूर, दि. केंद्रीय मंत्री नामदार ज्योतिरादित्य सिंधिया कोल्हापूर दौऱ्यावर आले होते.

 रविवारी रात्री नामदार सिंधिया यांनी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची सदिच्छा भेट घेतली.

Advertisements

राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे व केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे मैत्रीपूर्व संबंध असल्याने महाडिक कुटुंबीया तर्फे उत्साहाने स्वागत करण्यात आले 

धनंजय महाडिक नेहमीच आपल्या स्वभावाप्रमाणे कोल्हापूर दौऱ्यावर कुठलेही मंत्री दौऱ्यावर आले असता त्यांचे आदरपूर्वक स्वागत व पाहुणचार करण्यात नेहमीच पुढाकार असतो त्यामध्ये त्यांच्या कुटुंबीयांचा सक्रिय सहभागही असतोच “कोल्हापूरच्या विकासासाठी” महाडिक कुटुंबीया तर्फे नेहमीच चांगले संबंध जोपासले जातात.

 विकासवाडी इथल्या महाडिक फार्मवर खासदार महाडिक यांनी नामदार ज्योतिरादित्य सिंधिया यांचे स्वागत केले. 

यावेळी उभयतांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. नामदार सिंधिया यांनी सहकुटुंब महाडिक फार्मला भेट देऊन, कौटुंबिक जिव्हाळा वृद्धिंगत केला. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक, आमदार अमल महाडिक, भाजपच्या महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा सौ. शोमिका महाडिक, पृथ्वीराज महाडिक, सौ. वैष्णवी महाडिक , श्री. कृष्णराज महाडिक, कुमारी शांभवी अमल महाडिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *