रस्त्यावर कचरा आढळलेस आरोग्य निरिक्षकांवर होणार दंडात्मक कारवाई
अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे...

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 20 Second

कोल्हापूर दि. ३ :- शहरामध्ये कच-याचे ढिग व गटारी तुंबलेचे आढळलेस संबंधीत भागातील आरोग्य निरिक्षकास जबाबदार धरले जाणार असलेचे अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे यांनी सांगितले. शहरातील कचऱ्याबाबत सर्व विभागप्रमुख व आरोग्य निरिक्षक यांची संयुक्त आढावा बैठक आज महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती.    

  यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे यांनी आढावा घेताना यामध्ये सर्व आरोग्य निरिक्षक यांनी दैनंदिन सकाळी 6 वाजता भागामध्ये हजर राहून फिरती करण्याच्या सूचना दिल्या. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांना फिरती करताना काही ठिकाणी हजऱ्या कामावर नसताना मांडलेचे आढळून आले आहे. त्यामुळे मुकादम जर बोगस हजऱ्या मांडत असतील तर आरोग्य निरिक्षक यांनी पडताळणी केली पाहिजे. अशा चुकीच्या पध्दतीने हजऱ्या मांडल्या तर कोणाचीही गय केली जाणार नाही. त्याच्यावर गंभीर कारवाई केली जाईल. कामामध्ये कोणतीही हलगर्जी झालेस मुकादम व आरोग्य निरिक्षक यांना जबाबदार धरण्यात येईल. आरोग्‍य विभागाला जादा 30 टिप्पर कचरा उठावासाठी दिली असल्याने आता 100 टक्के कचरा उठाव झाला पाहिजे. जर फिरती करताना कचरा रस्तेच्या बाजूला आढळून आलेस पहिल्यांदा मुकादम व आरोग्य निरिक्षक यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. यामध्ये कोणतीही सुधारणा न झालेस संबंधीतांवर प्रशासकीय कारवाई केली जाईल अशा सक्त सूचना दिल्या. त्याचबरोबर टिप्परद्वार कचरा नेताना रस्तयावर कोठेही कचरा सांडणार नाही याची दक्षता घ्यावी. ओला व सुका कचरा असा वेगवेळा गोळा करावा. मोठमोठया अपार्टमेंटमध्ये त्यांचा कचरा त्याच ठिकाणी कंपोस्ट खत तयार करण्यासाठी नागरीकांच्यात जनजागृती करण्याच्या सूचना केल्या. त्याचबरोबर नागरीकानी कचरा घंटागाडीतच टाकावा, प्लॅस्टिकचा वापर करु नये असे आवाहन करुन नागरीकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या.

 यावेळी शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, सहा.आयुक्त नेहा आकोडे, स्वाती दुधाणे, उज्वला शिंदे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, उप-जल अभियंता रावसाहेब चव्हाण व सर्व आरोग्य निरिक्षक उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *