जिल्ह्या बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला धोका

विशेष प्रतिनिधी शरद माळी :  कोल्हापूर जिल्ह्यात २७ मार्चला १ रुग्ण आढळला होता,त्यानंतर एप्रिल अखेर १० वर तर  तदनंतर १४ वर गेली होती मे च्या सुरुवातीपासून ते १३ मे या कालावधीत रुग्ण आढळले आहेत. यापैकी ९ रुग्ण तर ५ दिवसात आढळले आहेत, यामुळे जिल्ह्यात रुग्ण वाढीचा वेग वाढला आहे.

मुंबईहून आलेल्या आणि गवसे (ता. चंदगड)  येथील रहिवासी  असलेल्या तिघांचे  अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले होते.  यामध्ये तीस वर्षे महिलेसह तिच्या अकरा आणि सहा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.  या तिघांनाही तातडीने सीपीआर मधील कोरोना कक्षात हलवण्यात आले.       आज पुन्हा दोघांच्या अहवाल पॉझिटिव्ह आलेत तीन दिवसात आठ रुग्ण  आढळल्याने, जिल्ह्यात प्रशासन हादरले आहे.  त्यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या २६ वर गेली आहे.

Advertisements

जिल्ह्यातील   कोरोना   बाधितांची  संख्या कमी होत असतानाच, जिल्ह्या बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढत आहे.   जिल्ह्याचा धोका वाढत आहे.  जिल्ह्यात आणखी दोन कोरोना ग्रस्त  आढळून आल्याने कोल्हापूर जिल्ह्यात करोनाबाधित रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते.

जिल्हयात कोरोनाचे पुन्हा दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, त्यात एका २० वर्षीय तरुणाचा आणि ३३ वर्षीय महिलेचा समावेश आहे ही महिला ८ महिन्याची  गर्भवती असून, ती शित्तुर तर्फ ता. शाहूवाडी येथील आहे. या महिलेवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत, तर २० वर्षीय तरुणावर इचलकरंजी येथे  आय जी एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *