जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनमार्फत आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त परिचरिकांचा सन्मान

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 33 Second

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : १२ मे जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो या दिनानिमित्त जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन मार्फत सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे हा दिन साजरा करण्यात आला.

  यावेळी परिचारिकांना गुलाब पुष्प देऊन त्यांच्या सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. जखमी सैनिकांची सेवा करणाऱ्या फ्लॉरेन्स नाईटिंगल यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.
फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म १२ मे १८२० रोजी झाला. याला २०० वर्षे पूर्ण झाली आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने २०२० हे वर्ष ‘नर्सिंग वर्ष’ म्हणून नुकतेच जाहीर केले आहे यासह परिचरिकांसाठी ‘सपोर्ट अँड सेलिब्रेटी नर्सेस अँड मिडवाईव्हज’ हे ब्रीदवाक्य घोषित केले आहे. त्यामुळेच हा दिवस जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन मार्फत परिचरिकांचा सन्मान करून साजरा करण्यात आला.
यावेळी जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष शिरीष पाटील यांनी बोलताना परिचारिकांनी केलेली सेवा व त्यांनी केलेले परिश्रम हे वाखानण्याजोगे आहे त्यांच्या सहकार्याशिवाय आपण कोविड -१९ वरती नियंत्रण ठेवू शकलो नसतो. भारत परिचारिकांच्या सेवेचे उपकार कधीच विसरणार नाही. घर, कुटुंब, सांभाळत रुग्णांची सेवा सर्व नर्सेस लीलया पेलत आहेत ,असे सांगितले.
यावेळी संस्थेचे सचिव डॉ अरुण धुमाळे ,डॉ. पी पी शहा, खजानिस डॉ महादेव जोगदंडे, डॉ रमेश जाधव,डॉ. शिवराज देसाई डॉ. शीतल पाटील,डॉ. राजेश कागले, डॉ. विनायक शिंदे डॉ. अजित कदम, डॉ. राजेश सातपुते ,डॉ.शिवराज जितकर व मान्यवर उपस्थित होते.यावेळी परिचरिकांनी उपस्थितांचे आभार मानले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *