कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत तीन गार्बेज टिपर वाहने आज महापालिकेत उपलब्ध झालेली आहेत.
यासाठी रक्कम रुपये २९,७२,०८२/- इतका खर्च स्वच्छ भारत अभियनामधून करण्यात आलेला आहे. सदर वाहनांद्वारे शहरातील दैनंदिन निर्माण होणारा घनकचरा संकलन करण्याचे काम करण्यात येणार आहे.
यापुर्वी महापालिकेने १०४ ऑटो टिप्पर खरेदी केल्या आहेत. याद्वारे शहरातील प्रत्येत प्रभागातून घरोघरी कचरा संकलन करण्यात येत आहे. आज या गार्बेज टिपरचे लोकार्पण महापौर सौ.निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.
या गार्बेज टिपरद्वारे शहरातील विविध भाजी मार्केटमधील ओला व सुका कचरा गोळा करणे, मटण मार्केटमधील मांस मिश्रीत कचरा व हॉटेलमधील वेस्ट कचरा संकलन करण्यासाठी या टिपरचा वापर केला जाणार आहे.
याटिपरमधून दैनंदिन ५ टन कचरा वाहून नेला जाणार आहे. यावेळी आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील व मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार उपस्थित होते.
कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या विशेष प्रयत्नाला यश

Read Time:1 Minute, 38 Second
अभिनंदन .. चांगल्या उपक्रमात महानगरपालिका सहभागी झाली.. सर्वाच्या सहकार्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद