Getting your Trinity Audio player ready...
|
Media control news network
कोल्हापूर, प्रतिनिधी/ शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनात सुरु असलेल्या पी. जी. डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नालिझम, सर्टिफिकेट कोर्स इन डॉक्युमेन्ट्री फोटोग्राफी आणि सर्टिफिकेट कोर्स इन शॉर्ट फिल्म मेकिंग या तिन्हीही अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.
हे तिन्हीही अभ्यासक्रम पार्ट टाईम आहेत. इतर कोणताही पूर्णवेळ अभ्यासक्रम शिकत असताना किंवा नोकरी आणि व्यवसाय करतही हे अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. विद्यापीठात फक्त शनिवार आणि रविवारी या कोर्सचे प्रशिक्षण दिले जाते. या तिन्हीही कोर्ससाठी वयाची कोणतीही अट नाही. पी. जी. डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नालिझम हा पदवीनंतरचा एक वर्षाचा कोर्स आहे. या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सर्टिफिकेट कोर्स इन डॉक्युमेन्ट्री फोटोग्राफी आणि सर्टिफिकेट कोर्स इन शॉर्ट फिल्म मेकिंग हे दोन्ही कोर्स तीन महिने कालावधीचे असून ते बारावी पास असणार्या कोणालाही करता येतात.
या तिन्हीही अभ्यासक्रमासाठी अध्यासनात स्टुडिओ, विविध सॉफ्टवेअर्स, संगणक लॅब, कॅमेरे यासह अन्य सर्व सुविधा विद्यापीठाने उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी https://sukapps.unishivaji.ac.in/pgentrance/#/login या लिंकवर कागदपत्रे अपलोड करुन नोंदणी करावी. या तिन्हीही कोर्सबाबत अधिक तपशील हवा असल्यास विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनात विद्यार्थ्यांनी सपंर्क करावा, असे आवाहन अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.