कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : कोल्हापूर जिल्ह्यात २७ मार्चला १ रुग्ण आढळला होता, त्यानंतर एप्रिल अखेर दहा वर तर तदनंतर रुग्णसंख्या चौदा वर गेली होती, मे च्या सुरुवातीपासून ते १६ मे या कालावधीत रुग्ण आढळले आहेत, यापैकी ९ रुग्ण ५ दिवसात आढळले आहेत, यामुळे जिल्ह्यात रुग्ण वाढीचा वेग दिवसागणिक वाढत चालला आहे. मुंबईहून आलेल्या आणि गवसे (ता. चंदगड) येथील रहिवासी असलेल्या तिघांचे अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले होते.
यात ३० वर्षीय महिलेसह तिच्या ११ आणि ६ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. या तिघांनाही तातडीने सीपीआर मधील कोरोना कक्षात हलवण्यात आले. त्यानंतर आणखी दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तीन दिवसात आठ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात प्रशासन हादरले होते. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या २६ वर गेली .
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत असतानाच जिल्ह्या बाहेरून येणाऱ्यांच्या प्रमाणात वाढत होत असल्यामुळे जिल्ह्याचा धोका वाढत आहे.
गुरुवारी आणखी दोन कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते, त्यात एक २० वर्षीय तरुण आणि ३३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. ही महिला 8 महिन्याची गर्भवती असून ती शित्तुर तर्फ ता. शाहूवाडी येथील आहे. या महिलेवर सी पी आर मध्ये उपचार सुरू आहेत तर तरुणावर इचलकरंजी येथे आय जी एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत
आज सीपीआर प्रशासनाकडून आणखी सात नवे रुग्ण आढळल्याची माहिती मिळाली असून, कोल्हापूर जिल्ह्यात एकूण कोरोना बंधीतांचा आकडा ३६ वर गेला आहे .