अलमट्टी उंचीबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सांगली /कोल्हापूर शिष्टमंडळासह केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांची भेट

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 34 Second

अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारामधील अनियमितता राष्ट्रीय बांध सुरक्षा प्राधिकरणाकडून तपासले जाईल.

Media control news network

MIC/ नवी दिल्ली, दि.४: कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा मधील बांधकामबाबतची अनियमितता राष्ट्रीय बांध सुरक्षा प्राधिकरणा (National Dam safety authority) कडून तपासली जाईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज शिष्टमंडळासह केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना माहिती दिली.

श्रमशक्ती भवन येथे आज झालेल्या बैठकीत राज्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्यासह कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि सह पालकमंत्री माधुरी मिसाळ, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील खासदार आणि आमदार शिष्टमंडळात सहभागी होते. सेंट्रल वॉटर बोर्ड कमिशनचे अध्यक्ष, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या प्रधान सचिव देबाश्री मुखर्जी बैठकीत उपस्थित होत्या. कर्नाटक राज्यशासनाने अलमट्टी धरणाची पूर्ण साठवण पातळी (FRL) ला ५१९.६० मीटर वरून ५२४.२५६ मीटर वाढवण्याचा प्रस्ताव सादर केला असून, मात्र सध्या असणाऱ्या धरणाच्या उंचीमुळे वर्ष २०१९ आणि २०२१ मध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. भविष्यातही अतिवृष्टी झाल्यास या धरणाच्या बॅक वॉटर मुळे अधिक मोठे नुकसान होऊ शकते. भविष्यात होणारी आपत्ती टाळण्यासाठी आज राज्याच्या जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेत शिष्टमंडळने केंद्रीय मंत्री यांची भेट घेतली. 

आज झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चेअंती केंद्रीय मंत्री पाटील यांनी राष्ट्रीय बांध सुरक्षा प्राधिकरण यांच्याकडून कर्नाटक सरकारने अलमट्टी धरन बाधतांना केलेल्या अनियमिततेची तपासणीचे निर्देश दिले. 

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आतापर्यंत राज्य शासनाच्यावतीने झालेल्या अभ्यासानुसार अलमट्टी धरणमुळे कृष्णा नदी आणि तिच्या उपनद्यांमध्ये पाणी तुंबणे वाढले आहे, त्यामुळे नदीच्या वाहून नेण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. सांगली आणि कोल्हापूर येथे पूरच्या पाण्याचा ओसरनाचा वेग कमी झाला आहे. यामुळे लगतच्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये नेहमीसाठी पूर परिस्थिती निर्माण झाली असून यापरीसरातील जीवनमान बिघडले आहे. शेतीवर तसेच नागरी जीवनावर याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकारला अलमट्टी धरणाच्या उंची वाढीबाबत तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. 

आज झालेल्या बैठकीत शिष्टमंडळामध्ये खासदार शाहू शहाजी छत्रपती, धनंजय महाडिक, विशाल पाटील, धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, अरुण लाड, डॉ. विश्वजीत कदम, राहुल आवाडे, राजेंद्र पाटील येड्रावकर, डॉ. अशोक कुमार माने, सदाभाऊ खोत, सत्यजित देशमुख, सुधाकर गाडगीळ, आदी मान्यवर उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now