कोरोना परिस्थिती हाताळण्यास महाराष्ट्र सरकार अपयशी : भा.ज.पा. कडून निषेध

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी शरद माळी :  भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगर जिल्हा यांच्यावतीने जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, भाजपा प्रदेश सदस्य महेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलेल्या महाराष्ट्र शासनाच्या विरोधात निवेदन सदर करण्यात आले.

यावेळी संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, उपाध्यक्ष संतोष भिवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Advertisements

या निवेदनाद्वारे त्रस्त सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, मोलमजुर यांच्यासाठी सरकारने तातडीने मदत आणि त्यांचे जीवन सुरळीत होण्यासाठी पाउले टाकत सुस्त झालेल्या प्रशासनाला गतिमान करून वर उल्लेख केलेल्या सर्वसामान्यांच्या दारापर्यंत योग्य ती सरकारी मदत पोहचवावी अशी कळकळीची विंनती करीत आहोत असे भाजपा शिष्टमंडळाच्यावतीने सूचित करण्यात आले.

आज संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये व तालुका स्तरावर कोरोनाच्या परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलेल्या महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यासाठी निवेदन देऊन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आले.

 

 

.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *