उपसंपादक दिनेश चोरगे : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊन मध्ये महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध संस्थांच्या वतीने महिलांसाठी ऑनलाइन स्पर्धा आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे.
अशीच स्पर्धा शांतिदूत परिवाराच्या वतीने देशपातळीवरील ऑनलाईन इंडियन कोहिनूर सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
लॉक डाउन मध्ये घेतलेल्या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या स्पर्धेत कोल्हापूर मधील शीतल पाखरे या मिसेस गोल्डन इंडियन कोहिनूर ठरल्या आहेत.
त्यासाठी त्याचे पती शरद पाखरे यांचं मोठं सहकार्य लाभलं आहे. दरम्यान , पुढील आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा गोवा इथं डिसेंबर महिन्यात होणार असून, या स्पर्धेसाठी शीतल पाखरे यांची निवड देखील झाली आहे.
प्रत्येक व्यक्ती मधे एक कलावंत लपलेला असतो. गरज असते ती त्या व्यक्तीतील कलावंताला साद देण्याची.
शांतिदूत प्रॉडक्शन्स असाच एक आगळा वेगळा उपक्रम राबविला आहे. महिलांना घरी बसुन सौंदर्य स्पर्धेमध्ये भाग घेऊन स्वतः मधील कलागुण सादर करावे , यासाठी अखिल भारतीय स्तरावरील ह्या स्पर्धेत वय वर्ष ३ महिने ते ६० वर्ष वयोगट असलेले एकुण ६०० स्पर्धक स्पर्धेकरीता निवडण्यात आले. एकुण १४ विभागात विभागणी करुन स्पर्धेत रंगत आली.
ही अशी एकमेव स्पर्धा होती, जी संपुर्णपणे घरात बसुन सहभागी व्हायची होती व ह्या स्पर्धेत सामान्य स्पर्धकांसोबतच दिव्यांग स्पर्धक सुद्धा सहभागी झाले. दरम्यान या स्पर्धेत कोल्हापूर मधील शीतल पाखरे या मिसेस गोल्डन इंडियन कोहिनूर ठरल्या आहेत. त्यासाठी त्याचे पती शरद पाखरे यांचं मोठं सहकार्य लाभलं आहे.
दरम्यान , इंडियन कोहिनूर ऑनलाइन सौंदर्यस्पर्धा चे परिक्षण श्रीमती अनिता राठोड , संदीप जोशी, योगेश जाधव यांनी केलं आहे.