पल्लवी निंबाळकरचे यश

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी :   सांगली जिल्ह्यातील सावळज (ता.तासगाव ) येथे राहणारी  कुमारी पल्लवी चंद्रकांत निंबाळकर हिची आज २० मे रोजी शासकीय बॅकेंत कृषी अधिकारी पदी निवड झाली असून, २०१९ ते २०२० मध्ये घेण्यात आलेल्या आय.बी.पी.एस. ( ए.एफ.ओ.) या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली .
तिचे माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय सावळज व उच्च माध्यमिक शिक्षण विद्यानिकेतन तासगाव तसेच पदवीचे शिक्षण छत्रपती राजर्षी शाहु महाराज काॅलेज ऑफ अॅग्रीकल्चर, कोल्हापूर येथे पूर्ण झाले. तिला वडील चंद्रकांत निंबाळकर व आई सुनिता निंबाळकर याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *