राष्ट्रवादीच्या वतीने सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामधील सर्व डाॅक्टर व आशा स्वयंसेविका यांना फेस शिल्ड मस्कचे वाटप

सांगली विशेष प्रतिनिधी नजीर शेख :  आदरणीय जयंतरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट मुंबई यांच्या मदतीने कोरोना विषाणू विरूध्दच्या लढाईत जोमाने पुढे असणाऱ्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामधील सांगली शहर मधील सर्व डाॅक्टर व आशा स्वयंसेविका यांच्या साठी फेस शिल्ड मास्कचे वाटप सां मि कु चे उपायुक्त स्मृती पाटील मॅडम आणि महापालिका आरोग्य अधिकारी आंबोळे सर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब,युवक शहर जिल्हा अध्यक्ष राहुल दादा पवार,मा.नगरसेवक अल्पसंख्यांक सेलचे शहर जिल्हाध्यक्ष आयुबभैय्या बारगीर,नगरसेवक मैनुद्दीन बागवान,नगरसेविका संगीता हारगे,अल्पसंख्यांक महिला शहर जिल्हाध्यक्ष नगरसेविका डॉ. नर्गिस सय्यद,मिरज शहर अध्यक्ष अभिजीत हारगे,अल्पसंख्यांक युवक शहर जिल्हाध्यक्ष वाजिद खतीब,सांगली शहर जिल्हा महिला उपाध्यक्षा राधिका हारगे,मिरज शहर महिला अध्यक्षा वंदना चंदनशिवे,मा. इमरान तहसीलदार युसुफ जामदार आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *