कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : दर्ग्याचा उरूस आत्ता चाललेल्या कोरोना व्हायरस च्या महामारी मुळे रद्द करण्यात आला आहे. पारंपारिक वाद्याच्या गजरात आणि अतिशबाजी, घोडे अशा लाव्याजम्यासह निघत होती. यावर्षी कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाचा विचार करून गलेफ मिरवणूकही रद्द करण्यात आली आहे.
फक्त मुजावर लोकांच्या उपस्थितीत दर्ग्यातच धार्मिक विधी पूर्ण करण्यात आला. रात्री १०.१५ वाजता दर्ग्याच्या आत पाचच मुजावर गलेफ घालण्यात आले. आणि बाकीचे मुजावरांनी बाहेर उभारून दुआ केली.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून हा विधी पार पडला. नात सलाम, फतेहा शरीफ, दुआ करण्यात आली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशवासियांसाठी व जगवासियांसाठी दुआ करण्यात आली.
यावेळी दर्ग्याचे मुख्य खादिम लियाकत मुजावर, ऐनुद्दीन मुल्ला, अल्ताफ मुतवल्ली, मुकादम गुरुजी, शकील मुतवल्ली, इम्तियाज मुतवल्ली, फिरोज मुजावर ,दिलावर मुजावर, जमाल झारी , अमीन झारी,शाहरुख गडवाले, आदी उपस्थित होते.
