कोरोनाच्या वाढत्या प्रसारा बाबत कोल्हापूर जिल्ह्यांत कडक उपाय योजना करावी
कोल्हापूर नागरी कृती समिती ची मागणी

मा.उद्धवजी ठाकरे सोा
मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य
निवेदन द्वारा
मा.भाऊसाहेब गलांडे
निवासी उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना सादर

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी नियाज जमादार : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कारण परत जिल्ह्यातून लोक मोठ्या संख्येने कोल्हापुरात येत आहेत. प्रशासनाने वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असतानाही काही लोक कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता परस्पर कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात व शहरात स्थलांतर करत आहेत.
मुंबई,पुणे व इतर जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात येणार्‍यांमुळे स्थानिक नागरिकांना भयंकर त्रास सोसावा लागत असून ,सर्वत्र भीतीचे वातावरण होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात मागील दिवसा पाठीमागे कोरोनाग्रस्तांचे अल्प प्रमाण असताना आज घडीला कोरोनाग्रस्तांची संख्या भरपूर वाढली आहे. कोल्हापूर जिल्हा ऑरेंज झोन मध्ये आहे . तो आता रेड झोन मध्ये जातो की काय ,असे वाटत आहे. तरी शासनाने, प्रशासनाने, पोलिस यंत्रणेने गांभीर्याने कडक पावले उचलावीत व स्थलांतरितांच्या वर कडक कारवाई करावी. जनतेने बाहेरून येणाऱ्या लोकांची माहिती प्रशासनाला कळवावी ,असे आवाहन कृती समिती तर्फे करण्यात येत आहे.
कोल्हापूर हद्दीत कोणालाही प्रवेश देऊ नये, कडक लॉकडाऊन करण्यात यावा.
मुस्लिम बाधंवाचा पविञ रमजान ईद सण येत आहे. बाजारपेठेत खरेदी सुरू आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा वापर होतो का, ते पाहिले पाहिजे. गर्दीमुळे धोका उत्पन्न होऊ शकतो. त्याचा ठपका एका विशिष्ट समाजावर होण्याची शक्यता आहे, तरी छञपती शाहूंच्या कोल्हापूर नगरीमध्ये सर्व सलोख्याचे वातावरण असून त्याला गालबोट लागता कामा नये.

Advertisements

२) अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज परदेशी उच्च शिक्षणासाठी च्या शिष्यवृत्ती ला क्रीमीलेयर ची अट तात्काळ रद्द करावी.
यावेळी परिवर्तन संघटनेचे अध्यक्ष अमोल कुरणे, युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे राज्य उपाध्यक्ष सुशांत पवार, कोल्हापूर नागरी कृती समितीचे निमंत्रक इशाद मुल्ला, मुबारक आत्तार, जेष्ठ पत्रकार रविराज कोल्हटकर, ,युनिस पटवेगार,वि. स. खांडेकर प्रशालेचे ग्रंथपाल पी.डी. धनवडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *