जिल्ह्यातील नागरिकांनी अफवेवर विश्वास ठेऊ नका

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : कोल्हापूर जिल्ह्यात बाहेरून चोरून येणाऱ्या काही मोजक्या लोकांमुळे कोल्हापूरमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. प्रशासनाने कोल्हापूर जिल्ह्याचे काही भाग सील केल्याने व योग्य त्या औषधो उपचारामुळे काही रुग्ण कोरोनामुक्त झाले होते.

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याने सुटकेचा नि:श्वास सोडला होता, परंतु काही दिवसापासून पुण्या- मुंबई सारख्या रेड झोन मधून कोल्हापूरकडे स्थलांतर करणाऱ्या अज्ञात लोकांनी कोल्हापूरकडे चोरवाटेने आल्याने कोल्हापूर जिल्ह्याला कोरोना सासर्गाचा धोका निर्माण केला आहे.

आज प्रशासनाकडून आलेल्या अहवालानुसार कोरोना रुग्णांची संख्या सकाळी १० वाजेपर्यंत कोरोना  पोझिटीव्ह अधिकृत अकडेवरी ८३ असल्याचे सांगण्यात आले  आरोग्य प्रशासनाच्या  स्पष्टउक्तीमुळे जिल्ह्यातील कोरोना पोझिटीव्ह रुग्णांच्या संख्येचे शतक झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे, यासंदर्भात  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ बी.सी. केम्पी पाटील यांनी सागितले. १०० पार केली असलेल्या चुकीच्या आकड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आज एकूण रुग्ण संख्या ८३ वर गेली असली तरी, दिवसागणिक जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत गेले, तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे, कोल्हापुरात ही धोक्याची घंटा ओळखून प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना आखाव्यात.

मिडिया कंट्रोलच्या विशासाहार्त बातमीदारीबद्दल वाचकवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *