कोल्हापूर विशेष वृत्त
कोल्हापूर दिनांक २१/ कोल्हापूर शहरातील चव्हाण व पाटील कुटुंबीयांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ऐश्वर्या चव्हाण व मयूर पाटील यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात व पारंपरिक थाटात संपन्न झाला.
प्रकाश रामचंद्र चव्हाण यांची नात तसेच सतीश प्रकाश चव्हाण यांची ज्येष्ठ कन्या कु. ऐश्वर्या हिचा विवाह कोल्हापूर येथील शिवाजी पेठेतील शिवाजी सखाराम पाटील यांचे ज्येष्ठ सुपुत्र मयूर यांच्याशी हरिप्रिया मंगल कार्यालय येथे पार पडला.

विवाह सोहळा पारंपरिक विधी, मंगलमय वातावरण आणि उत्साही उपस्थितीमुळे संस्मरणीय ठरला. या मंगलप्रसंगी दोन्ही कुटुंबामधील स्नेह जिव्हाळा आणि परस्परांचा आदर स्पष्टपणे जाणवत होता उपस्थितीत नातेवाईक मित्रपरिवार व हितचिंतकांनी वधू वरास आशीर्वादाचा वर्षाव करत सोहळ्याची शोभा अधिकच वाढवली.
आबालवृद्धापासून ते जेष्ठपर्यंत सर्वांनी एकत्र येत आनंद क्षण वाटून घेतले.
कुटुंबातील नातेसंबंध अधिक दृढ करणारा आणि स्नेहबंध अधिक घट्ट करणारा हा सोहळा सर्वांच्या स्मरणात राहणारा ठरला.
हा विवाह दोन जीवांना जोडणारा आणि दोन कुटुंबांना स्नेहबंधात गुंफणारा पवित्र सोहळा असल्याचे यावेळी अधोरेखित झाले. नातेवाईक, मित्रपरिवार व हितचिंतकांच्या उपस्थितीत हा सोहळा आनंदात साजरा करण्यात आला.
या शुभ प्रसंगी व्हिनस कॉर्नर ग्रुपचे सदस्य आपल्या कुटुंबियाचे उपस्थित राहून नवदाम्पत्यास शुभेच्छा देत आनंदोत्सवात सहभागी झाले.
या प्रसंगी ‘व्हिनस कॉर्नर ग्रुप’चे सदस्य आपल्या कुटुंबियांसह उपस्थित राहून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.

