महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे सुरु
ग्राहकांना वीजबिल भरण्याचे आवाहन

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 9 Second

उपसंपादक दिनेश चोरगे : गेली दोन महिने लॉकडाऊनमुळे बंद असलेली कोल्हापूर  जिल्ह्यातील महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे सोशल डिस्टंसिंग व सुरक्षेचे नियम पाळून आता पुन्हा एकदा सुरु करण्यात आली आहेत. वीज ग्राहकांनी नजीकच्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्रावर आपले वीजबिल भरुन सहकार्य करावे असे आवाहन महावितरणचे प्रभारी मुख्य अभियंता श्री. अंकुर कावळे यांनी केले आहे.

सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणनेही वीजबिल भरणा केंद्रे बंद ठेवली होती. चौथ्या टप्प्यांत लॉकडाऊन शिथील झाल्यावर केंद्र शासन, महाराष्ट्र शासन व स्थानिक प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे व मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन महावितरणने वीजबिल भरणा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा बँक लॉकडाऊन काळातही चालू असल्यामुळे त्यांच्या १९७ शाखांमधील बिल भरणा सुरूच होता. उर्वरित सहकारी बँका, पतसंस्था, कार्यालयीन भरणा इत्यादी मिळून २३८ भरणा केंद्रे लॉकडाऊन काळात बंद होती. ही २३८  वीजबिल भरणा केंद्रे टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यात आली आहेत.

लॉकडाऊन काळात वीजबिलाची छपाई व वितरण बंद ठेवून सरासरी वापराने बिल आकारणी करण्यात आली होती. परिणामी ग्राहकांकडे छापील बिले नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेल्या वीजबिलाच्या संदेश, ईमेल अथवा संकेतस्थळावरुन डाऊनडोड केलेले पीडीएफ स्वरुपातील बिल दाखवून भरणा करावा. अगदी जून्या वीजबिलावरील ग्राहकक्रमांकाधारे सुध्दा वीजबिल भरुन घेतले जाईल. दरम्यान भरणा केंद्रांवर ग्राहकांनी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळावेत. मास्क वापरावा. तसेच वीजबिलाचे नेमके पैसे द्यावेत.

दोन महिने वीजबिल भरणा बंद असल्याने महावितरणची आर्थिक घडी विस्कटली आहे. महसूल कमालीचा घटला असून या आर्थिक आरिष्ठातून सावरण्यासाठी वीज ग्राहकांनी आपल्या नजीकच्या केंद्रावर किंवा महावितरण मोबाईल ॲपच्या आधारे वीजबिलाचा भरणा करावा, असे आवाहन प्रभारी मुख्य अभियंता श्री. अंकूर कावळे यांनी केले आहे.

 

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *