कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : महाराष्ट्र राज्यात करोना विषाणुचा (कोव्हिड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ हा दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करणेत आला आहे. सुदैवाने जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासन करत असलेल्या प्रयत्नामुळे तसेच स्थानिक नागरीकांचे सहकार्यामुळेच आजपर्यत कोरोना साथीचे फैलावास नियंत्रित ठेवणे शक्य झाले होते. परंतु सध्या राज्यातील रेडझोन असणारे काही भागातून आलेल्या नागरीकांमुळे शहरामध्ये कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे.
शहरांतर्गत अशाप्रकारे आलेल्या नागरीकांची प्रथम आरोग्य तपासणी करून यापैकी सर्दी, खोकला किंवा तापाची लक्षणे असणारे नागरीकांचे घशाचे स्वॅब घेणेत येतात. तसेच ज्या नागरीकांमध्ये अशी कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत त्यांची प्राथमिक तपासणी करून त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षामध्ये १४ दिवस ठेवणेत येत आहे.
जर वैद्यकीय अधिकारी यांचे सुचनेनुसार परगावाहून आलेल्या एखादया नागरीकास अशी कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे होम क्वारंटाईन करणेस सांगितले असलेस, प्रभाग समिती सचिव यांनी अशा नागरीकांस होम क्वारंटाईन करणेकामी त्यांचे घरी जावून घरामध्ये स्वतंत्र खोली, स्वतंत्र बाथरूम/टॉयलेट इत्यादीची व्यवस्था असलेस व त्याबाबत पूर्ण खात्री पटल्यानंतरच प्रभाग समिती सचिव यांच्या स्तरावर त्या नागरीकांस होम क्वारंटाइन करणेबाबत निर्णय घेतील.
आजमितीला परगावाहून आलेल्या नागरीकांमुळे कोल्हापूर जिहयातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असून आजमितीला कोल्हापूर जिल्हया अंतर्गत कोरोना बाधितांची संख्या वाढलेली असून, त्यांना कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी तयार करणेत आलेल्या, संस्थात्मक अलगीकरण कक्षामध्ये ठेवणेत आलेले आहे. असे क्वारंटाईन केलेले नागरीक शहरामध्ये कोठेही फिरत नसून, त्यांना अलगीकरण कक्षामधून बाहेर जाणेस प्रतिबंधित करणेत आलेले आहे.
तरी नागरीकांनी देखील आपली व आपले कुटुंबाची काळजी घ्यावी व कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापौर निलोफोर आजरेकर यांनी निवेदनाद्वारे केले आहे.