एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही जिल्ह्याला मोठा दिलासा : डॉ. बी.सी.केम्पी पाटील

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रविराज जगताप : काल सकाळी १० ते आज रात्री ८ पर्यंत १७६२  प्राप्त अहवालापैकी १६९६ अहवाल निगेटिव्ह (सिंधुदुर्गचे ६६ अहवाल निगेटिव्ह) आहेत. आज जिल्ह्यातील एकही अहवाल पॉझीटिव्ह आलेला नाही. हा मोठा दिलासा आहे.

आजअखेर जिल्ह्यात एकूण ३७८  पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- ३२ , भुदरगड- ४९ , चंदगड- २५ , गडहिंग्लज-१३  , गगनबावडा- ६ , हातकणंगले- ४ , कागल- ११ , करवीर- ११ , पन्हाळा- २०, राधानगरी- ४८, शाहूवाडी- ११९ , शिरोळ- ५ , नगरपरिषद क्षेत्र- १० , कोल्हापूर महापालिका क्षेत्र- २० असे एकूण ३७३  आणि पुणे -१ ,  सोलापूर-१ , कर्नाटक-२  आणि आंध्रप्रदेश-१  इतर जिल्हा व राज्यातील पाच असे मिळून एकूण ३७८ रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *