उजळाईवाडीतील गाव गुंडाच्या मुसक्या गोकूळ शिरगाव पोलिसांनी आवळल्या : संघटित गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांची कडक कारवाई
तीन दिवसात ईम्या गॅंग गजाआड

गांधीनगर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर :  येथील कुप्रसिद्ध संशयित गुंड  इम्रान नायकवडी उर्फ ईम्याभाई गँगच्या वाढत्या उपद्रवाला पायबंद घालून तीन दिवसात संपूर्ण गॅंगच्या गाव गुंडांना पोलिसांनी गजाआड केले आहे. नेमलेल्या पोलीस पथकाकडून आरोपींना पकडण्यात यश आले आहे. या गँगचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

उजळाईवाडी (ता. करवीर) येथील दळवी कॉलनी परिसरात वाहनांची तोडफोड,तक्रारदार रवींद्र प्रकाश  सूर्यवंशी (वय-३९) व अनिल  रामचंद्र पोवार यांच्या विरोधात व जीवे मारण्याची दिलेली धमकी तसेच आपला सहकारी मोहन उर्फ चिक्या खवरे याच्या विरोधात पोलिसात साक्ष देऊन नये, तसेच इम्या गॅंग विरुद्ध तक्रार दाखल करू नये याकामी दहशत निर्माण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.

Advertisements

त्या संदर्भात गोकूळ शिरगाव पोलिसांनी  रेकॉर्डवरील संशयित गुन्हेगार इम्रान नायकवडी उर्फ ईम्याभाई (वय-२२,रा.नेर्ली,उजळाईवाडी) , अक्षय रामचंद्र पाटील (वय-२२, रा श्रीराम कॉलनी उजळाईवाडी) , ओम्या उर्फ ओंकार किशोर इंदुलकर (वय-२५ ,रा.कणेरी ता.करवीर) व विनायक मोहन  पाटील( वय-२४, रा. म्हसोबा माळ,गोकूळ शिरगाव ता करवीर)  या रेकॉर्ड वरील गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेर्ली-तामगाव रोडवरील दळवी कॉलनी, उजळाईवाडी येथे आपल्या गॅंग मधील सदस्य अक्षय पाटील व मोहन उर्फ चिक्या खवरे याच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिल्याचा राग मनात धरून फिर्यादी रवींद्र सूर्यवंशी व त्यांचे शेजारी अनिल रामचंद्र पोवार यांच्या घरावर हल्ला चढवून फिर्यादी फिर्यादीचा भाऊ फिर्यादीची पत्नी यांच्यावर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या घरासमोरील स्कार्पिओ गाडी, डिस्कवर दुचाकी, घराच्या खिडक्या-दारे, यांची घातक शस्त्रांनी तोडफोड केली. तसेच फिर्यादीचे भाऊ प्रकाश सूर्यवंशी त्याच्या हातातील सोन्याची अंगठी व पाकीट बळजबरीने काढून घेतले. झटापटी मध्ये फिर्यादीचा भाऊ व  पत्नी बालबाल बचावल्या. तसेच फिर्यादीच्या घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी आरोपींकडून देण्यात आली. एखाद्या चित्रपटाला साजेसा हल्ला करून आरोपीने परिसरामध्ये आपल्या गॅंगची दहशत अबाधित राखण्याचा प्रयत्न केला व अंगठी व पाकिटातील रोख रक्कम घेऊन पोबारा केला. या थरारक घटनेने संपूर्ण उजळाईवाडी परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या हल्ल्यामुळे कोरोनाच्या बंदोबस्तात असलेल्या पोलिस यंत्रणेसमोर नवीन आव्हान निर्माण झाले होते. परंतु पोलिसांनी धडक कारवाई करीत,फरारी आरोपींचा तीन दिवसात शोध घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या.

या दहशत निर्माण करणाऱ्या गाव गुंडांना २८ मे पर्यत पोलीस कोडठी सुनावली असून आरोपी यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. आरोपी यांचेकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे लोखंडी हातोडी,तलवार,लोखंडी रॉड व एडका,तसेच तक्रारदार याच्याकडून बळजबरीने काढून घेतलेली सोन्याची अंगठी,तसेच पाकीट त्यामधील पॅन व आधार कार्ड हस्तगत करण्यात आले आहे.सदर गुन्ह्यात आरोपीनी पन्नास हजार रुपयेचे नुकसान केले.या गुन्ह्याचा तपास गोकूळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि सुशांत चव्हाण यांनी हाती घेतला होता.पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक तिरुपत्ती काकडे,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. प्रशांत अमृतकर,याच्या मार्गदर्शनाखाली तपास केला.

पोलीस तपास कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण,सहाय्यक फौंजदार मानसिंग रजपूत,पोलीस हवालदार प्रदीप जाधव,बाजीराव पोवार,हौसिंग पाटील,संतोष तेलंग ,राकेश माने, युवराज कांबळे,अरुण नागरगोजे,सुरेश खोत ,धनाजी सपाटे यांनी तातडीने सहभाग घेऊन आरोपींना अटक केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *