आरोग्य विभागाच्यावतीने तिसऱ्या टप्यात ८७१५ घरांचे व ३६६४० लोकांचे सर्व्हेक्षण

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सतीश चव्हाण : भारतामध्ये व महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरु आहेत.

पहिल्या टप्यामध्ये दि.१८ मार्च पासून सुरु करण्यात आलेले संपूर्ण शहराचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असून, यामध्ये १४४३१९ घरांचे सर्व्हेक्षण केले आहे. यामध्ये  ६२८५३२ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.

Advertisements

तसेच दुसऱ्या टप्यामध्ये दि.१८ मार्च पासून सुरु करण्यात आलेले संपूर्ण शहराचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असून यामध्ये १४५१०२  घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये ६४३९६१ नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे तिसऱ्या टप्यात दि.२७ मे रोजी ८७१५ घरांचे सर्व्हेक्षण केले असून, यामध्ये ३६६४० नागरीकांची तपासणी करण्यात आली. सदरचे सर्व्हेक्षण रमणमळा, न्यू पॅलेस, बाजारगेट, शुक्रवार पेठ, तोरस्कर चौक, पंचगंगा तालीम, दुधाळी, लक्षतीर्थ वसाहत, बोंद्रेनगर, कारंडे मळा, सदर बाजार, कदमवाडी, पाटोळेवाडी, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, माकडवाला वसाहत, रुक्मिणी नगर, आयोध्या पार्क, एल. आय. सी. कॉलनी, सुर्वेनगर, आपटेनगर, देवकरपाणंद, सोमराज कॉम्प्लेक्स, जुईनगर, दादू चौगुले नगर, लाईन बाजार, रामानंदनगर, जरगनगर, जवाहरनगर, नेहरुनगर, म्हाडा कॉलनी, बालाजी पार्क, राजेंद्रनगर, ताराराणी कॉलनी, एस.एस.सी. बोर्ड या ठिकाणी घरोघरी जाऊन करण्यात आले.

या तिसऱ्या टप्यामध्ये आज अखेर १००५४३  घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये  ४३४०११  नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. सदरचा सर्व्हे हा ११ नागरी आरोग्य केंद्राकडील कर्मचा-यांमार्फत करण्यात आला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *