कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सतीश चव्हाण : शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व हर्षल सुर्वे ,दक्षिण शहर प्रमुख शिवाजी जाधव ,उपशहर प्रमुख सुधीर राणे, सर्जेराव पाटील (तात्या ) व जयराम पवार यांच्या सहयोगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी ३१ मार्च रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
कोरोनाने साऱ्या जगाला व्यापले आहे. महाराष्ट्रात या महामारीच्या वाढीचा वेग जास्त व चिंताजनक आहे. प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधी वैद्यकीय सेवेतील मान्यवर व राबणारे हजारो हात ह्या फैलावाला रोखण्याचा शर्तीने , एकाद्या योद्या प्रमाणे प्रयत्न करीत आहेत.
महाराष्ट्रातल्या माणुसकीच्या पुरा बरोबर मुबलक रक्ताच्या पूरवठ्याचीही महाराष्ट्राला गरज आहे.
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराने आणि आचाराने प्रेरित झालेले कोल्हापूरचे नागरिक कोल्हापूरच्या लौकिकाला साजेसा रक्तदानाचा उपक्रम करून महाराष्ट्राला दिशा देण्याचा नक्कीच प्रयत्न करतील , अशी माहिती कोल्हापूर जिल्हा शिवसेना- प्रमुखांनी निवेदनाद्वारे दिली.