सांगली विशेष प्रतिनिधी शरद गाडे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गुरुवारी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये १३७ वी जयंती साजरी करण्यात आली .
प्रारंभी आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलताना अँड. बाळासाहेब देशपांडे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक प्रतिभावंत कवी होते. अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी केलेले कार्य लोकांत्तर आहे तसेच ते मराठी भाषाशुद्धीचे ही प्रेरणास्थान होते . पन्नास वर्षाची काळ्यापाण्याची शिक्षा झालेले ते एकमेव स्वातंत्र्यवीर होते, अशा स्वातंत्र्यसूर्याचे देशाला कायम स्मरण राहील ,असे मत व्यक्त करून बाळासाहेब देशपांडे यांनी सावरकरांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली .
यावेळी राष्ट्रीय परिषद सदस्य प्रकाशतात्या बिरजे, भाजपा ज्येष्ठ नेते श्रीकांततात्या शिंदे, नगरसेवक विनायक सिंहासने, नगरसेवक राजेंद्र कुंभार, विनोद पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दीपक माने, युवा मोर्चा सरचिटणीस मकरंद म्हमुलकर, अमित देसाई, योगेश जाधव, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष गौस पठाण, गणेश कांबळे, महेंद्र पाटील, अजयकुमार वाले, आबासाहेब जाधव, श्रीधर जाधव आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.