महापालिकेशी संबंधित विविध न्यायालयामध्ये प्रलंबित असणारे दाव्यांसंदर्भात महापौरांकडून आढावा

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रवी जगताप  :  महापालिकेशी संबंधित विविध न्यायालयामध्ये प्रलंबित असणारे दाव्यांसंदर्भात माहीती घेणेकरीता महापालिकेच्या महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी महापालिका पॅनेलवरील जेष्ठ व कनिष्ठ विधीज्ञ यांची संयुक्त बैठक स्थायी समिती सभागृहात आयोजित केली होती.

यावेळी स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, राष्ट्रीय काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख, उप-आयुक्त निखील मोरे उपस्थित होते. या बैठकीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेशी संबंधित विविध न्यायालयामध्ये प्रलंबित असणारे दाव्यांचे सद्यस्थितीबाबतची माहिती महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी घेतली.

Advertisements

यावेळी महापालिकेच्या महसुली उत्पन्नाशी संबंधित असणारे दाव्यांसह टोप खण, लक्ष्मीपुरी धान्य मार्केट येथील गाळे, गांधीनगर येथील अतिक्रमण, फेअरडील इत्यादी संदर्भात प्रलंबित असणारे दावे लवकरात लवकर निकाली काढणेसाठी सर्व विधिज्ञांना महापौर यांनी सुचना दिल्या. तसेच महापालिकेशी संबंधित बिगर न्यायालयीन प्रकरणांमध्ये थेट विधि अधिकारी यांनीच तातडीने अभिप्राय देणेच्या सुचना दिल्या.

केवळ न्यायालयीन प्रकरणांमध्येच विधिज्ञांचे अभिप्राय घ्यावेत असे आदेशही यावेळी दिले. विधी अधिकारी संदिप तायडे यांनी या बैठकीच्या अनुषंगाने दर महीन्याला महापालिकेशी संबंधित दाव्यांचे सद्यस्थितीबाबत प्रशासनाने माहिती महापौर कार्यालयात सादर करणेचे आदेश दिले.
या बैठकीस उपस्थित असणारे सर्व विधिज्ञ हे त्यांचेकडे येणारे़ दाव्यांबाबत संबंधित विभागाकडून स्वत: पाठपुरावा करून कामे चालवित असल्यामुळेच आतापर्यंत महापालिकेच्या एकुण दाव्यांपैकी जवळपास ७० टक्केपेक्षा जास्त दाव्यातील स्थिती ही महापालिकेच्या बाजूने आल्याबद्दल सर्व विधिज्ञांचे महापौरांनी अभिनंदन केले.

तसेच अशा पध्दतीने प्रथमच बैठक आयोजित करून सर्व विधिज्ञांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणींची जाणून घेतल्याबद्दल उपस्थित सर्व विधिज्ञांनी महापौर सौ.निलोफर आजरेकर यांचे आभार मानले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *