सांगली जिल्ह्यात आज अखेर ७३ रुग्ण कोरोनामुक्त तर सद्यस्थितीत उपचाराखाली ५१ रुग्ण : जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी

सांगली विशेष प्रतिनिधी संतोष कुरणे : सांगली जिल्ह्यात आज दुपारी एक वाजेपर्यंत चार रुग्ण कोरोनाबाधित झाले असून तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आज आखेर  ७३ रुग्ण कोरोना मुक्त झाली असून,उपचाराखालील रुग्णांची संख्या ५१ झाली आहे तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आजतागायत एकूण १२८ रुग्ण कोरोनाबाधित ठरले आहेत व उपचाराखाली असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी पाच रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.

Advertisements

आज कोरोना बाधित झालेल्या रुग्णांमध्ये आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरातील १८ व १९ वर्षांच्या दोन मुलांचा समावेश आहे.  तर  मुंबईवरून आलेला खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथील साठ वर्षीय व्यक्ती तसेच आटपाडी तालुक्यातील झरे येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरातील पाच वर्षाचा मुलगा पॉझिटिव्ह आले आहेत तर आज कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांमध्ये शिराळा तालुक्यातील माहरे येथील ७० वर्षीय व्यक्ती , वाळवा  तालुक्यातील कुंडलवाडी येथील ३७ वर्षीय व्यक्ती  व  आटपाडी तालुक्यातील कामत येथील ६५ वर्षीय व्यक्ती असे तीन रुग्ण आज कोरोनामुक्त  झाले आहेत .

आज आखेर ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८८  असून शहरी भागातील २९  तर महानगरपालिका क्षेत्रातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११ इतकी आहे.

पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांपैकी खानापूर तालुक्यातील साळसिंगे येथील आज पॉझिटिव्ह आलेल्या ६० वर्षाच्या व्यक्तीला नॉनइन्व्हेजीव व्हेंन्टिलेटरवर ठेवण्यात आले आहे.  औढी तालुका जत येथील ५५  वर्षीय व्यक्तीला सद्यस्थितीत इन्व्हेजीव व्हेंन्टिलेटरवर ठेवण्यात आलेले असून सदर रूग्णाची स्थिती चिंताजनक आहे. (कडेबिसरी) सांगोला जिल्हा सोलापूर येथील ४८ वर्षीय रुग्णाला ऑक्सिजनवर उपचार अद्याप सुरूच असून सदर रुग्णाची स्थिती स्थिर आहे.

शिराळा तालुक्यातील खिरवडे  येथील ५६ वर्षीय रुग्णावर सद्यस्थितीत नॉनइन्व्हेजीव व्हेंटिलेटर उपचार अद्याप सुरूच असून सदर रुग्णाचीही स्थिती स्थिर आहे . शिराळा तालुक्यातील मणदुर  येथील ८१  वर्षाच्या रुग्णाला  नॉनइन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले  असून त्या रुग्णाचीही  स्थिती स्थिर आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *