सांगली विशेष प्रतिनिधी संतोष कुरणे : छायाचित्रण ही कला आत्मसात करून त्यावर आपले कुटुंब चालवणाऱ्या छायाचित्रकारावर लॉकडाऊनमुळे अक्षरश: उपासमारीची वेळ आली होती, पण सरकारने लॉकडाऊन शिथिल केल्याने छायाचित्रण व्यवसाय परत सुरु झाला. परंतु लॅब चालकांनी वाढलेल्या दरवाढीमुळे छायाचित्रकार त्रस्त झाले असल्यामुळे सांगली जिल्हा छायाचित्रकार संघ सांगली मार्फत आर्थिक टंचाईमुळे पूर्वीचे रेट ठेवण्यासंदर्भात लॅब चालकांना निवेदन देण्यात आले.
त्याचप्रमाणे शुक्रवारी ३ जून रोजी छायाचित्रकार असोसिएशन तसेच फोटो प्रिंटिंग लॅब चालक व मालक यांची मिटिंग झाली . यामध्ये लॅब चालकांनी वाढवलेल्या दरवाढीबाबत चर्चा करण्यात आली. आजच्या परिस्थितीला अनुसरून ही दरवाढ योग्य नाही. प्रत्येक छायाचित्रण व्यवसाय बांधवाकडे कोविंड -१९ लॉक डाऊन मुळे आर्थिक टंचाई आहे. त्यामुळे लॅब चालकांनी पूर्वीचे रेट ठेवावेत, असे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी छायाचित्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी व सर्व लॅब चालक-मालक उपस्थित होते.