Share Now
Read Time:1 Minute, 21 Second
उपसंपादक दिनेश चोरगे : सराफ दुकानामध्ये येणाऱ्या प्रत्येकाची ओळख पटण्यासाठी प्रत्येकाला मास्क काढण्याची परवानगी देण्यात यावी, मागणी कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी केली.
ओसवाल म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर व हँडग्लोज या बाबींची सक्ती केली आहे. मात्र मास्कमुळे कित्येकवेळी समोरील व्यक्ती कोण आहे हे ओळखणे कठीण होते. यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने सराफी दुकानामध्ये आलेल्या प्रत्येकाने मास्क काढून आपली ओळख पटवून द्यावी व पुन्हा मास्क घालावा. यासाठी पोलिस आणि प्रशासनाने अनुमती द्यावी.
दरम्यान, अशा आशयाचे निवेदन श्री. ओसवाल यांच्या हस्ते जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांना आज देण्यात आले. यावेळी संचालक संजय चोडणकर, बाबासाहेब खाडे आदी उपस्थित होते.
Share Now