जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने वृक्षारोपण

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:4 Minute, 51 Second

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी :  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने आज पुईखडी येथील परिसरात महापौर सौ.निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, परिवहन समिती सभापती सौ.प्रतिज्ञा उत्तुरे, महिला व बालकल्याण समिती सभापती शोभा कवाळे, नगरसेवक अभिजीत चव्हाण व नगरसेवका रिना कांबळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी या परिसरात ६० वृक्षाचे रोपण करण्यात आले. यामध्ये कडूलींब, मोर आवळा, गुळभेंडी, मोहगणी, गुलमोहर, मुचकुंद, काटेरी सावर इत्यादीसह विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले.
आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बोलताना लावण्यात आलेल्या झाडांची काळजी घेणेही तितकेच महत्वाची आहे. भविष्यकाळात झाडांची देखभाल करणेही तितकेच गरजेचे असलेचे सांगितले.
यावेळी महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी बोलताना सर्वांनी जास्तीत जास्त झाडे लावावी, प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळावा, पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा असे आवाहन केले आहे.

चारही विभागीय कार्यालय अंतर्गत शहरात खड्डे मारणेचे काम चालू करण्यात आले आहे. यामध्ये विभागीय कार्यालय क्रं.१ अंतर्गत २२ ठिकाणे, विभागीय कार्यालय क्रं.२ अंतर्गत ७ ठिकाणे, विभागीय कार्यालय क्रं.३ अंतर्गत ७ ठिकाणे, विभागीय कार्यालय क्रं.४ अंतर्गत २० ठिकाणी उद्यान, ओपनस्पेस, बाजूपट्टी याठिकाणी वृक्षारोपन करण्यात येणार आहे. यामध्ये बहावा, कदम, कोनोकार्पस, बर्डचेरी, स्प्याथोडीया, लॅझेस्टोमिया, निलमोहर, कडूलिंब, जांभूळ व जंगली अशा प्रकारची १५०००  झाडे लावण्यात येणार आहेत.

याबरोबरच कसबा बावडा येथील ७६ द.ल.लि. क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प येथे आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे व प्रकल्प संचालक हेमंत काशीद यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रिय अधिकारी सुशील शिंदे, सचिन हरबळ, निलेश मारबळ व कर्मचारी उपस्थित होते. तसेच जयंती पंपीग स्टेशन येथेही आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्याक्रम पार पडला.

यावेळी शाखा अभियंता आर के पाटील, भरत देशपांडे, स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगांवकर, प्राजक्ता मांजगांवकर, सविता पडळकर, उन्मेश कांबळे, नागेश कुंभार, संतोष वरुटे, अपुर्वा खांडेकर, सुनिता मेघानी, विविकानंद कॉलेज एनएसएसचे विद्यार्थी  उपस्थित होते.
यावेळी शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे, राज्य उपाध्यक्ष सुशांत पोवार, जिल्हा सचिव शरद माळी पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, माहिती शिक्षण संवाद अधिकारी निलेश पोतदार, पर्यावरण अधिकारी आरोग्य अपेक्षा सुर्यवंशी, उद्यान अधिक्षक अरुण खाडे, सहाय्यक उद्यान अधिक्षक राम चव्हाण, अनिकेत जाधव, आशपाक आजरेकर व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *