Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : आज कोल्हापूर महानगरपालिकेचे मा. पदाधिकारी व अधिकारी यांचेसमवेत महापौर सौ निलोफोर आजरेकर यांनी शहरांमध्ये फिरती केली असता, शहराचे काही गजबजलेल्या व प्रमुख रहदारीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा कंटेनरबाहेर तसेच उघड्यावर पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
शहरातील अशा अनेक ठिकाणावर नेहमी कचरा साचून राहत असल्याचे दिसून येते. सध्या पाऊस सुरू असल्याने शहरांमध्ये अनेक ठिकाणी दुर्गंधी, अस्वच्छता व बकालपणाचे चित्र निर्माण होत आहे. या अनुषंगाने शहरातील अशाप्रकारे सातत्याने कचरा पडून राहणाऱ्या ठिकाणांची तातडीने स्वच्छता होणे व सातत्यपूर्ण रीतीने ही ठिकाणी स्वच्छ राहण्याच्या उद्देशाने आम्ही शहरांमध्ये clear Dirty spots मोहीम राबवण्याचे नियोजन केलेले आहे. या मोहिमेअंतर्गत आम्ही शहरातील नागरिकांना तक्रार स्वरूपात अशा ठिकाणांचे फोटो टाकण्यासाठी या whatsapp – ९८६०७३१५५५ नंबर वर व Facebook page : mayur of Kolhapur याची सुविधा उपलब्ध करून देत आहोत.
या दोन्ही माध्यमातून प्राप्त होणारे तक्रार येथे तक्रारीची तातडीने निर्गत करण्यात येणार आहे, तरी शहरातील नागरिकांनी आमचे व्हाट्सअप व फेसबुक पेज वर आपल्या परिसरात नेहमी कचरा साचून राहणाऱ्या ठिकाणाचे फोटो टाकून आपले शहर स्वच्छ – सुंदर – आरोग्यदायी राहण्यासाठी सुजाण नागरिक म्हणून या मोहिमेत आपल्या सहभाग द्यावा असे महापौर निलोफोर आजरेकर आवाहन यांनी आव्हान केले.