पंचगंगा नदी घाटावर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी शोध व बचाव कसा करावा याची दाखवली प्रात्यक्षिके

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सतीश चव्हाण :  गतवर्षीप्रमाणे संभाव्य पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फ़त आपत्ती व्यवस्थापनासाठी उपलब्ध असलेल्या सर्व साधनसामुग्रीची आज पंचगंगा घाट येथे चाचणी घेण्यात आली.

यामध्ये रेस्क्यु बेल्ट, बीए सेट, पोर्टेबल पंप, फायर सुट, लाईफ जॅकेट, सेप्टी नेट, लिफ्टींग बॅग, हायड्रोलीक स्प्रेडर कटर व जॅक, सॉ कटर, स्लॅब कटर, लाईफ बॉय, मनिला रोप, फ्लोटींग पंप, रबरी बोटी, लाईफ़ रींग इ. सर्व साहित्याची यशस्वी चाचणी आज पंचगंगा घाटावर घेण्यात आली. यावेळी अग्निशमन विभागाच्या जवानांनी शोध व बचाव कसा करावा, बुडणाऱ्या व्यक्तींना कसे वाचवावे यांची प्रात्यक्षिके यावेळी दाखविण्यात आली.

Advertisements

 

यावेळी महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी मागील वर्षी पूराचा अनुभव पाहता यावर्षी महापालिकेने खरबदारी घेऊन योग्य त्या उपायोजना केलेल्या आहेत. नागरीकांनीही प्रशासनास सहाकार्य करावे असे आवाहन केले आहे.

आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी महापालिकेकडे सात बोटी आहेत. आणखीन तीन बोटी खरेदी करण्यात येत आहेत. त्या बोटी लवकरच महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे दाखल होत आहेत. तसेच नागरीकांच्या सुरक्षेसाठी ७५ लाईफ जॅकेट घेतलेले आहेत. त्याचबरोबर संभाव्य पूरपरिस्थिती  पाहता पूर बाधीत क्षेत्रातील नागरीकांनी नदीची इशारा पातळी ओलांडताच तात्काळ स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन केले.

गतवर्षी पूर पूरपरिस्थितीमध्ये अनेक सेवाभावी संस्था, नागरीकांनी सहकार्य केलेले आहे. त्याचप्रमाणे यावर्षीही संभाव्य पूर परिस्थीतीला सामोरे जाणेसाठी सर्वांच्या सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

यावेळी उपआयुक्त निखिल मोरे, सहाय्यक आयुक्त अवधूत कुंभार, चेतन कोंडे, मुख्य अग्निशमन अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रणजित चिले, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, स्थानक अधिकारी तानाजी कवाळे, मनीष रणभिसे, दस्तगीर मुल्ला, आश्पाक आजरेकर व अग्निशमन विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *