बनावट ई-मेल आणि संदेश बेरोजगारांना पाठवून केली जातेय आर्थिक लूट

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी : उजळाईवाडी ता (करवीर ) येथील विमानतळावर नोकरी मिळेल, असा बनावट ई-मेल आणि संदेश बेरोजगारांना पाठवून आर्थिक लूट केली जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेकांना हा मेसेज जात असून पंधराशे रुपये बँक खात्यावर भरावेत. तुम्हास विमानतळावर नोकरी देण्यात येईल. त्यात विमानतळावरील ग्राऊंड हँडलिंग सीएसए पोस्टसाठी अथवा तिकीट बुकिंगसाठी तुम्हाला काम मिळू शकते. विमानतळावरील कामाचा अनुभव नसल्यास, तुम्हास ४५ दिवसाचे ट्रेनिंग घ्यावे लागेल.
प्रशिक्षण घेऊन तुमची निवड झाल्यास, सध्याच्या पगारामध्ये २५ ते ३० टक्के वाढ होईल . तुम्ही कोणत्या एअरलाइन्स कंपनीची निवड केली आहे, याबाबत अद्याप माहिती नाही त्यामुळे तुमच्याकडून कागदपत्रे मागितली जात असून, कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहेत .
याकरिता आयडी कार्ड प्रमाणपत्रे ,गुणपत्रके व पंधराशे रुपये नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे.
कंपनीकडून कागदपत्रे पडताळणी करून कागदपत्रे खरी असल्यास विमानतळावर नोकरीसाठी निवड केली जाईल, असे सांगून पैसे, कागदपत्रे व फोटो घेतले जात आहेत.

Advertisements

 

 

परंतू विमान प्राधिकरणाकडून कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे मागितलेली नाहीत, बोगस लिंग तयार करून लोकांची लुबाडणूक करणारे सक्रिय झाले आहेत अशा लिंक वर कोणीही विश्वास ठेवू नये, विमानतळावरील नोकरीसाठी कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जात नसून जी लिंक फिरत आहे त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. आणि विमान प्राधिकरण अशा कोणत्याही प्रकारच्या लिंक देत नसून अधिकृत जाहिराती ह्या वर्तमान पत्रातून ऑल इंडिया प्राधिकरण जाहीर करते. तेव्हा अशा लिंक वर किंवा अफवा वर कोणीही विश्वास ठेवू नये अशा अफवा पसरवणाऱ्या वर कारवाई करण्यात येणार आहे. असा खुलासा विमान प्राधिकरण संचालक कमल कुमार कटारिया यांनी केला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *