कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील व नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष अमिरभाई शेख यांचे मार्गदर्शनाखाली शनिवार व रविवार २ दिवस झालेल्या पालकत्व शिबिरास पालकांचा व विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
सुमारे ६० ते ७० पालक व विद्यार्थ्यांनी या सेमिनारचा लाभ घेतला. नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाचे प्रदेश अध्यक्ष अमीरजी शेख यांनी रविवारी शिबिरास उपस्थित राहून त्यांच्या या उपक्रमाचे अभिनंदन केले व पालकांशी संवाद साधून, यापुढे अशा प्रकारच्या शिबिरासाठी कायम सहकार्य करू अशी ग्वाही दिली . तसेच नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया कोल्हापूर चे अध्यक्ष अक्षय शेळके यांचे उपक्रमासाठी अभिनंदन केले.
द्रोणा एज्युकेशनल सर्व्हिसेसचे पालकत्व अभ्यासक कर्णजित गावडे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले व काही पालकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. तसेच सर्व पालकांनी सदरच्या उपक्रमाचे कौतुक केले.
सादर सेमिनारचे आयोजक कोल्हापूर शहर उत्तर नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अक्षय शेळके यांनी अमिरजी शेख व कर्णाजित गावडे यांचे आभार व्यक्त करून सदर उपक्रमाची सांगता केली.