सांगली विशेष प्रतिनिधी शरद गाडे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार स्व.विलासरावजी शिंदे यांचे सामाजिक ,सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान आहे, कार्यकर्त्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहरजिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी स्व. विलासरावजी शिंदे यांच्या प्रथम पुण्यतिथी मध्ये बोलताना व्यक्त केले.
यावेळी फोटोचे पूजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहरजिल्हाध्यक्ष संजय बजाज व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अविनाश (काका) पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुल दादा पवार ,प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, अल्पसंख्यांक शहरजिल्हाध्यक्ष आयुब बारगीर, अनिता पांगम, आशा पाटील,नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, उत्तम आबा कांबळे, विशाल हिप्परकर, शुभम जाधव, संजय सूनके,रविंद्र कदम, ऋषिकेश कांबळे, प्रितम कांबळे, अलिश पवार, सचिन लाड, सुमित कुंभोजकर, अनिकेत भंडारे हे मान्यवर उपस्थित होते.