Share Now
Read Time:1 Minute, 15 Second
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रवी जगताप : लोक -कल्याणाचा वसा आणि वारसा हा शाहू महाराजांचा अनुयय आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
राजर्षींच्या विचार आणि कृतीचे आचरण केल्यास स्वतःसह लोकजीवनही समृद्ध बनेल, असेही श्री मुश्रीफ म्हणाले.
राजर्षी शाहू महाराजांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त शाहू समाधीस्थळावर श्री मुश्रीफ यांच्यासह माजी महापौर आर. के. पवार, माजी महापौर सौ. सरिता मोरे, आदिल फरास, राजू लाटकर व मान्यवरांनी अभिवादन केले.
यावेळी स्थायी समितीचे सभापती संदीप कवाळे, प्रकाश गवंडी, नगरसेवक सचिन पाटील, विनायक फाळके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष महेंद्र चव्हाण, अतुल गवई, किसनराव कल्याणकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Share Now