मिडिया कंट्रोल न्यूस नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालयाकडून) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात ६९.७२ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार कोयना धरणातून २१११ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील इचलकरंजी हा १ बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या कोयना धरणात ३२.२२ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ६६.४१ इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे :- तुळशी ४२.३८ दलघमी, वारणा ४०१.३० दलघमी, दूधगंगा २८०.११ दलघमी, कासारी ३०.१६ दलघमी, कडवी १६.१० दलघमी, कुंभी ३१.०२ दलघमी, पाटगाव ३८.०२ दलघमी, चिकोत्रा १६.८३ दलघमी, चित्री १४.९८ दलघमी, जंगमहट्टी ८.७० दलघमी, घटप्रभा ४४.१७ दलघमी, जांबरे १४.३३ दलघमी, कोदे (ल पा) ५.४४ दलघमी असा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे :- राजाराम ११.३ फूट, सुर्वे १२.६ फूट, रुई ३९.४ फूट, इचलकरंजी ३५ फूट, तेरवाड ३४.६ फूट, शिरोळ २७.९ फूट, नृसिंहवाडी २१ फूट, राजापूर ११.३ फूट तर नजीकच्या सांगली ६.६ फूट व अंकली ५.७ फूट अशी आहे.
पाऊस/तालुकानिहाय
जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात २९ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- ०.८८ एकूण ११४.२५ मिमी, शिरोळ- निरंक एकूण ८८.१४ मिमी, पन्हाळा- ०.५७ एकूण ३५८.७१ मिमी, शाहूवाडी- ४.५० मिमी एकूण ४८८.५०, राधानगरी- निरंक एकूण ४६४.५० मिमी, गगनबावडा-२९ मिमी, एकूण ११५५.५० मिमी, करवीर- निरंक एकूण ३१४.९१ मिमी, कागल- निरंक एकूण ३५१.७१ मिमी, गडहिंग्लज- ०.४३ एकूण २१७.७१ मिमी, भुदरगड- ३ एकूण ३९०.२० मिमी, आजरा- ३ एकूण ४५३.२५ मिमी, चंदगड- १.८३ मिमी एकूण ४८५.८३ मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.