Share Now
Read Time:1 Minute, 20 Second
सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : सांगली जिल्ह्यात नव्याने १० कोरोना बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३६९ झाली आहे त्यातील तीन रुग्णांची स्थिती चिंताजनक आहेत.
सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. आज नव्याने दहा रुग्ण सापडले असून, त्यात कवठेमहांकाळ तालुक्यातील दोन, सांगली शहरात एक, जत तालुक्यात घेऊन अशा रुग्णांचा समावेश आहे.
सांगली जिल्ह्यात आज अखेर एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३६९ झाली आहे. त्यातील २२६ रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत तर तेरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे .
सध्या १३० रुग्ण मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती सांगलीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय साळुंखे यांनी दिली.
Share Now