गडमुडशिंगीत वाढत्या डेंगू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांची भेट

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 27 Second

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर :  गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे वाढत्या डेंगू संशयित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा हिवताप अधिकारी विनोद मोरे यांनी गडमुडशिंगीतील अति जोखमीच्या भागांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.

तसेच डेंगूचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी उपायांचा आढावा घेऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. त्याचप्रमाणे डेंगू आजाराच्या प्रतिबंधासाठी आवश्यक त्या सर्व साहित्यांचा व औषधांचा पुरवठा करण्याचे आश्वासन ही यावेळी दिले. डेंगू चा प्रसार रोखण्यासाठी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यावरही भर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच  गावातील तलावांमध्ये व इतर जल स्तोत्रांमधे डेंगू चा प्रसार करणाऱ्या डासांच्या अळ्या खाणारे गप्पी मासे तलावात सोडण्यात आले.

तसेच जिल्हा हिवताप अधिकारी विनोद मोरे यांनी गडमुडशिंगी तील डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी डेंगू प्रसार रोखण्यासाठी आवश्यक औषधे व धूर फवारणी यंत्र तात्काळ उपलब्ध करून दिले तसेच गावाला भेट देऊन व पुढील काळातही आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन मोलाची मदत केली आहे.

यावेळी गडमुडशिंगी गावचे सरपंच जितेंद्र यशवंत यांनी जिल्हा हिवताप अधिकारी विनोद मोरे यांनी गावास भेट  दिल्याबद्दल आभार व्यक्त करीत त्यांचा सत्कार केला.

यावेळी राज्य ताप कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बाजीराव कांबळे, उपसरपंच तानाजी पाटील ,ग्रामसेवक आर. एन. गाढवे,   प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर आर. एम मुल्ला, आरोग्य सहाय्यक एन. वाय. लोहार ,माजी सरपंच पांडुरंग कांबळे ,कृष्णात रेवडे ,गितेश डकरे ,आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी ,आशा सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

    चौकट

डेंगू चा प्रसार रोखण्यासाठी डबके, घरातील बॅरेल, टायर, करवंट्या कुंड्या, फ्रीज मागील कंटेनर, इत्यादी पाणी साठवून राहणारी साधने स्वच्छ करणे आवश्यक असून आठवड्यातून एक दिवस घरातील सर्व पाणी साठवण्याची साधनेही कोरडी करून आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळणे आवश्यक असल्याचे आग्रही मत यावेळी विनोद मोरे यांनी मांडले.


Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *