कोल्हापूर शिवाजी शिंगे : शाहूपूरी पोलीस ठाणे गु.र.नं .५२५ / २०२० भादंविस कलम ३८० मधील फिर्यादी रविंद्र कृष्णराव पाटील रा.राजारामपूरी ७ वी गल्ली , कोल्हापूर हे काम करत असलेले मलबार गोल्ड अॅन्ड डायमंड , व्हिनस कॉर्नर कोल्हापूर या दुकानातून दि. ३ जुलै रोजी १०.३० ते ११.४० वाजण्याच्या सुमारास अनोळखी ग्राहकाने सोने खरेदीच्या बहाण्याने दुकानात येवून फिर्यादी यांची नजरचुकवून सोन्याची डायमंड खडयाची एक अंगठी किंमत ६१००० / – रु.ची चोरी केल्याची फिर्याद फिर्यादी यांनी दिल्याने गुन्हा दाखल आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
सदर गुन्हयाचे तपासकामी पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी गुन्हे शोध पथकातील कर्मचारी यांना सदर दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करुन आरोपीचा शोध घेणेबाबत सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणी करुन सदरची अंगठी चोरी करुन घेऊन जाणारा आरोपी मुरलीधर आनंदराव पाटील (व. व. ३९ रा.नाधवडे ता.भुदरगड जि.कोल्हापूर) हा असल्याचे निदर्शनास आल्याने त्याला ताब्यात घेवून तपास केला असता त्याने गुन्हयाची कबुली दिली असून, त्याच्याकडून चोरीची डायमंड खडयाची सोन्याची अंगठी किंमत ६१,००० / – रु.ही हस्तगत करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख , अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे, पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भंडारे , पो.हे.कॉ.अशोक पाटील , प्रशांत घोलप , वसंत पिंगळे , किरण वावरे , युवराज पाटील , अनिल पाटील , प्रथमेश पाटील , पो.कॉ.विशाल चौगले , दिग्वीजय चौगले , दिगंबर पाटील , विजय इंगळे , नारायण कोरवी , विकास चौगले, यांनी केली आहे.