मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : महावितरणचे नूतन संचालक (वित्त) म्हणून रवींद्र सावंत यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला आहे. याआधी ते एमआयडीसीचे मुख्य वित्त व लेखाधिकारी म्हणून कार्यरत होते.
संचालक (वित्त) रवींद्र सावंत हे मूळ कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द (जि.सांगली) येथील मूळ रहिवासी असून, त्यांनी कोल्हापूर विद्यापीठातून रसायनशास्त्र या विषयात पद्व्युत्तर पदवी संपादन केली आहे.

तसेच यापूर्वी सावंत यांनी नॅशनल हेल्थ मिशनचे संचालक (वित्त), महानंदचे व्यवस्थापकीय संचालक आणि विधानभवन उपसचिव तथा वित्त नियंत्रण म्हणून मुंबई येथे काम पाहिले आहे.
