समाजातील वंचित घटकांपर्यंत सर्व मूलभूत सुविधा पोहचविणार : आमदार चंद्रकांत जाधव

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : समाजातील तळागाळातील व्यक्तींपर्यंत सर्व मूलभूत सुविधा पोहचविण्यावर भर देण्यात येत असून, शहरातील सर्व पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज सांगितले.

यादवनगर भागात प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थींना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

Advertisements

आमदार जाधव म्हणाले, सार्वजनिक वितरण व्यवस्था सक्षम आणि अधिक परिणामकारक करण्यासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग काम करीत आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील बदलामुळे प्रत्यक्ष लाभार्थ्याला मदत देता येत असून, नव्याने लाभार्थी जोडता येत आहेत. समाजातील तळागळातील व्यक्ती, वंचित घटकांपर्यंत सर्व मूलभूत सुविधा पोहचविण्यावर भर देण्यात येत आहे.

लॉकडाऊनच्या काळात शिधापत्रिका नसल्याचा तोटा लक्षात आला आणि नव्याने शिधापत्रिका काढण्यासाठी मागणी वाढली. त्यानुसार सर्व पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.  तसेच आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास, सामाजिक स्तर उंचावून, प्रत्येक नागरिकाचे राहणीमान व जीवनमान उंचावेल, असा सल्ला आमदार जाधव यांनी उपस्थित तरुणाईला दिला.

माजी नगरसेवक अप्पासाहेब गायकवाड म्हणाले, शिधापत्रिका काढून देण्याच्या नावाखाली आजपर्यंत अनेकांनी राजकारण केले; मात्र आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे भागातील लोकांचे शिधापत्रिकांचे स्वप्न पूर्ण झाले. यावेळी सागर शिंदे यांचा आमदार जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी डवरी समाजाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे, श्रमसाफल्यचे अध्यक्ष विश्वास शेंडगे, सागर गायकवाड, बालेचंद गडकरी, शाहरुख बागवान, इंदुमती चव्हाण, आदिनाथ शिंदे, फारुख कुरणे, शरफुद्दीन शेख, विनया गायकवाड, रूपाली पाटील, यास्मिन बेलापुरे, शमिना जैनापुरे, शबनम मनेर, उजा जानकर, लता वायदंडे, लक्ष्मी बंसवडे, अश्विनी ढोले, रेखा पाटील, विमल रास्ते, सुमन भोसले आदी उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *