राज्यात जुलै महिन्यात आतापर्यंत ५ लाख ८८ हजारावर शिवभोजन थाळ्यांचे वाटप : मंत्री छगन भुजबळ

मिडिया कंट्रोल न्यूज  नेटवर्क :   राज्यात दि. १ जुलै ते दि . ६ जुलै पर्यंत ८५७ शिवभोजन केंद्रातून पाच  रूपये प्रति थाळी याप्रमाणे ५ लाख ८८ हजार ४६९ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले,  असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राज्यात  गरीब व गरजूंना  एप्रिल महिन्यात २४ लाख ९९ हजार २५७, मे महिन्यात ३३ लाख ८४ हजार ०४०, जून महिन्यात  ३० लाख ९६ हजार २३२, जुलै मध्ये आतापर्यंत ५ लाख ८८ हजार ४६९ आणि असे एकूण  दि.१ एप्रिल  ते  दि .६ जुलै या कालावधीत ९५ लाख ६७ हजार  ९९८ शिवभोजन थाळ्या वाटप केल्या  आहेत.

Advertisements

 कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये, यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्वकांक्षी निर्णय मार्चमध्ये घेतलेला होता. हा सवलतीचा दर जूनपर्यंत लागू करण्यात आलेला होता. मात्र अजूनही नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये, या उद्देशाने हा सवलतीचा पाच रुपये दर सप्टेंबर पर्यंत  लागू राहणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *