व्यापाऱ्यांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यास कडक कारवाई : प्रांताधिकारी वैभव नावडकर

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 47 Second

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : व्यापाऱ्यांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करूनच व्यवसाय सुरु करावेत नियम मोडणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल ,किंबहुना दुकाने सील करण्याची ही कारवाई करण्यात येईल, अशा सक्त सूचना करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी दिल्या.

ते गांधिनगर परिसरातील व्यापारी संघटना बरोबर झालेल्या एल.डी.लाँन मधील बैठकीत बोलत होते.

यावेळी करवीर तहसीलदार शीतल मुळे मॅडम गटविकास अधिकारी सचिन घाटगे गांधीनगरचे सपोनि दीपक भांडवलकर यांची उपस्थिती होती.
नावडकर म्हणाले, सध्या गांधीनगर वळीवडे गावामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे असून येथील व्यापाऱ्यांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करूनच दुकाने सुरू ठेवावीत. व्यापाऱ्यांनी मास्क सॅनिटायझर सोशल डिस्टंसिंग , वेळ मर्यादा,अशा नियमांचे पालन करावे जे व्यापारी नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर प्रथम दंडात्मक व नंतर फौजदारी अशा स्वरूपाच्या कारवाया करण्यात येतील. याची जबाबदारी ग्राम समितीने घेऊन आपल्या गावात नियमांची अंमलबजावणी करावी.

दरम्यान या बैठकीस होलसेल ,रिटेल ,व्यापारी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी याबाबत काही सूचना केल्या. व्यापाऱ्यांनीही नियमांचे पालन करूनच व्यवसाय सुरु ठेवण्यात येईल अशी ग्वाही दिली.
तसेच व्यापाऱ्यांनी या महामारी संसर्ग रोगाचे गांभीर्य ओळखून स्वतः काळजीपूर्वक नियमांचे पालन करण्याची गरज आहे. अशी सूचनाही या बैठकीत काही व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली. तसेच जे व्यापारी नियमांचा भंग करतील त्यांच्यावर फौजदारी च कारवाई करण्यात यावी, असे मत काही सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मांडले.

गांधीनगर मधील वाढत्या गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने संबंधित गावच्या ग्राम समितीने कडक नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे असे मत काही माजी ग्रामपंचायत सदस्यांनी मांडले.
या बैठकीस प.स. सदस्य प्रदीप झांबरे, सरिता कटेजा, वळीवडे चे सरपंच अनिल पंढरे, गडमुडशिंगी चे सरपंच जितेंद्र यशवंत, चिंचवाडचे सुदर्शन उपाध्ये गांधीनगरच्या रितू लालवानी, ग्राम विकास अधिकारी आर्.एन. गाढवे, बी .डी. पाटील, पप्पू अहुजा, दिलीप कुकरेजा, गा.प.स.दीपक जमदानी,सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब कांबळे, धीरज टेहलानी, राजू कांबळे, गांधीनगर परिसरातील व्यापारी, नागरिक ग्रा प सदस्य उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *