कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : राजगृह या ऐतिहासिक वास्तूवर झालेल्या हल्ल्याचा ऐतिहासिक बिंदू चौक येथे एम.आय.एम व डी.पी.आय पक्षाकडून निषेध करण्यात आला.
मंगळवारी ७ जुलै रोजी संध्याकाळी हिंदू कॉलनी दादर, येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवास स्थान असणारे ऐतिहासिक वास्तू राजगृह वर अज्ञातांनी हल्ला करुन तोडफोड केल्याने तमाम भारतीयांच्या श्रद्धास्थानाला धक्का पोहचला आहे. आम्ही यांचा तीव्र शब्दात निषेध करीत असून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे, असे एम.आय.एम व डी.पी.आय च्या वतीने निषेध करण्यात आला.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर एम.आय.एम व डी.पी.आय तालुक्याच्या विविध भागातून पक्षाचे अनेक कार्यकर्ते एकत्र आले होते व इथून पुढे अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्यांचा पायबंद करण्यात यावा व आंबेडकर कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, असे पश्चिम महाराष्ट्र युवा प्रवक्ते शाहिद शेख यांनी प्रतिपादन केले.
दरम्यान त्यावेळी एम.आय.एम पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र युवा प्रवक्ता प्रा.शाहिद शेख, शहर अध्यक्ष सुहेल शेख, उपाध्यक्ष तौसीफ मौमीन, तालुका अध्यक्ष मोहसीन मौमीन, तालुका उपाध्यक्ष अय्याज मुजावर, तालुका सरचिटणीस इलियास कुन्नुरे, जावेद शेख,इजाज बागवान, इस्तियाक नदाफ,फहीम वस्ता,डी.पी.आय शहर अध्यक्ष प्रविण सोनवणे,तालुका कार्याध्यक्ष जीवन काबळे,तालुका उपाध्यक्ष सिदार्थ कांबळे, आदी मान्यवर उपस्थित होते.