कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधीनगर मेनरोडवर हद्द असलेल्या पाच गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या बेलगाम वाढत असल्याने तावडे हॉटेल उड्डाणपूल ते चिंचवाड रेल्वे फाटकापर्यंतचा परिसर सीमाबंद करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे, तसा आदेश करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी आज दिला.
गांधीनगर मेन रोडला हद्द असणाऱ्या पाच गावांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. हा संसर्ग रोखण्याकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपाय-योजना म्हणून हा आदेश पारित करण्यात आला आहे.
भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम व जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार तावडे हॉटेल उड्डाणपुल ते चिंचवाड रेल्वे फाटक दरम्यानचा भाग व त्यालगतचा परिसर प्रांताधिकारी नावडकर यांच्या आदेशाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात येत आहे व या क्षेत्राच्या चारही बाजूच्या सर्व रस्त्यांच्या सीमा सिलबंद करण्यात येत आहेत.