कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्यावतीने युध्द पातळीवर उपाययोजना सुरु आहेत. यासाठी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी कोव्हिड- १९ प्रादुर्भाव सुरु झाले पासून गेले तीन ते चार महिने विविध उपाययोजना करत आहेत.
या उपाययोजना करत असताना अधिकारी व कर्मचारी यांची प्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आजरेकर फौंडेशनच्यावतीने महापौर निलोफर आजरेकर यांच्या हस्ते महापालिकेच्या ४५०० कर्मचारी व अधिकारी यांना होमिओपॅथीक औषधाचे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम महापौर कार्यालयात घेण्यात आला. यावेळी महापालिकेच्यावतीने आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी होमिओपॅथीक औषधाचा स्विकार केला.
यावेळी महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयीन काम करत असताना स्वत:चीही काळजी घ्यावी. मास्कचा वापर करावा, वेळोवेळी सॅनिटायझरने हात स्वच्छ करावेत, सोशल डिन्स्टंन्सचे पालन करावे, शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करुन कार्यालयीन काम करावे, असे आवाहन केले.
यावेळी स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, डॉ.एस.एच.जोशी, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, कर्मचारी संघाचे जनरल सेक्रेटरी अजीत तिवले, आशपाक आजरेकर आदी उपस्थित होते.