Share Now
Read Time:1 Minute, 7 Second
कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्याच्या अनुषंगाने शनिवारपासून तीन दिवस सराफ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी आज दिली.
ते म्हणाले, शहरातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यासाठी ही साखळी तोडण्याच्या प्रयत्नासाठी येत्या शनिवारपासून १८ जुलै ते २० जुलै सलग तीन दिवस सराफ बाजार, सर्व दुकाने व शोरूम बंद ठेवण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहनही कुलदीप गायकवाड यांनी यावेळी केले.
Share Now