Getting your Trinity Audio player ready...
|
मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालयाकडून) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात १४०.११ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून १४५०, कोयना धरणातून २२२२ तर अलमट्टी धरणातून ४६१३० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.
पंचगंगा नदीवरील- राजाराम, शिंगणापूर, रुई व इचलकरंजी, भोगावती नदीवरील खडक कोगे असे एकूण ५ बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात ४४.२७ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ८९.०१३ इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ५०.२५ दलघमी, वारणा ५४१.०६ दलघमी, दूधगंगा ४३७.८१ दलघमी, कासारी ४२.६१ दलघमी, कडवी ३६.५७ दलघमी, कुंभी ४४.०५ दलघमी, पाटगाव ६८.६८ दलघमी, चिकोत्रा २०.५८ दलघमी, चित्री २३.९९ दलघमी, जंगमहट्टी १९.८८ दलघमी, घटप्रभा ४४.१७ दलघमी, जांबरे २३.२३ दलघमी, कोदे (ल पा) ६.०६ दलघमी असा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम १७.४ फूट, सुर्वे १८.१० फूट, रुई ४५ फूट, इचलकरंजी ४२ फूट, तेरवाड ३९ फूट, शिरोळ ३१.९ फूट, नृसिंहवाडी २५ फूट, राजापूर १४.६ फूट तर नजीकच्या सांगली ७.६ फूट व अंकली ७.७ फूट अशी आहे.
पाऊस / तालुकानिहाय
जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात ८३.५० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- ७.१३ एकूण १७५.३८ मिमी, शिरोळ- ७.४३ एकूण १७३.१४ मिमी, पन्हाळा- १४.५७ एकूण ५३८.१४ मिमी, शाहूवाडी- २० एकूण ७६४.३३ मिमी, राधानगरी- ३५.३३ एकूण ७७९ मिमी, गगनबावडा- ८३.५० मिमी एकूण २००६.५० मिमी, करवीर- १०.८२ एकूण ४०१.०९ मिमी, कागल- २७.४३ एकूण ५३५.७१ मिमी, गडहिंग्लज- ११.७१ एकूण ३६७.४३ मिमी, भुदरगड- १७.८० एकूण ६३९ मिमी, आजरा- १६.७५ एकूण ८७४.७५ मिमी, चंदगड- ८.५० मिमी एकूण ७८८.८३ मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.