Share Now
सांगली प्रतिनिधी नजीर शेख : सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, याकरता जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या आदेशाने व विभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर शहर विभाग सांगली, यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहरांमध्ये ११ ठिकाणी दररोज सकाळी व सायंकाळी नाकाबंदी करण्यात आली आहे.
नाकाबंदी मध्ये मोटरसायकलवरून डबलसीट, विना मास्क लावता, तसेच विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई केली जात आहे तसेच सायंकाळी ७ च्या नंतर अत्यावश्यक सेवा वगळता जे दुकान व्यवसायिक त्यांची दुकाने सुरू ठेवतील, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
नागरिकांनी सांगली शहरांमध्ये अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास करू नये, असेही आवाहन सांगली शहर पोलीसदलामार्फत करण्यात आले.
Share Now